सतराव्या
शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले
कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध
नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा
उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे
तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले,
तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे.
शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या
घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ,
१६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम
उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या.
मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी ( १६२४). त्यांपैकी
शहाजी हे प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास
चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी
जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत,
पण मोठ्या वैभवात गेले. "राधामाधवविलासचंपू" या समकालीन काव्यग्रंथावरून
शहाजीराजेंच्या योग्यतेची कल्पना येते.
शहाजीराजास जिजाबाई (सिंदखेडकर लखुजी जाधव यांची कन्या), तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन बायका होत्या. संभाजी आणि शिवाजी छत्रपती हे जिजाउंचे दोन पुत्र आणि तुकाबाईचा व्यंकोजी ऊर्फ एकोजी (तंजावर राज्याचा संस्थापक). या तिघांनी पुढे इतिहासात नाव कमावले. संभाजी कर्नाटकात शहाजीजवळ राहत असे. कनकगिरीच्या लढाईत (१६५४) पस्तीशीतच तो वारला. एकोजीने शहाजीराजे नंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली.
शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना १६४१ मध्ये जिजाऊ मासाहेबा समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. त्यांच्यामुळे शिवाजीच्या स्वतंत्र कर्तृत्वास वाव मिळाला. त्यांच्या साहाय्याने वयाच्या १२ वर्षांपासून शिवाजी जहागिरीचा कारभार पाहू लागला. त्या निमित्ताने पुण्याच्या आसपासचे मोक्याचे किल्ले त्याने ताब्यात घेतले. मावळ्यांनी संघटना करून विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध बंडच पुकारले. यातून मराठ्यांचे स्वराज्य स्थापण्याची कल्पना त्याला सुचली. पुढे प्रसंगानुसार आदिलशाह व मोगल यांच्याशी राजकारण व प्रसंगोपात्त युद्धे करून त्यांनी स्वराज्याची कल्पना स्वतःला राज्याभिषेक (६ जून १६७४) करवून जाहीरपणे सिद्ध केली आणि छत्रपतिपद धारण केले. शिवराई व होन ही नवी नाणी सुरू केली; अष्टप्रधान पद्धती स्थापिली, नवे पंचांग केले आणि राज्यव्यवहारकोश बनवून शासनातील फार्सी शब्दांचे उच्चाटन केले. देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर ३५६ वर्षांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. हे एक अद्भुत घडले. स्वराज्याबरोबर धर्मस्वातंत्र्य प्राप्त होऊन मुसलमानी राजवटीत हिंदूंचे खचलेले नीतिधैर्य त्यांना पुन्हा मिळाले.भोसले कुळाचे नाव शिवाजी महाराजांनामुळे इतिहासात अजरामर झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकस्मिक मृत्यूनंतर काही काळ अस्थिरता निर्माण झाली; पण नंतर रायगडावर युवराज संभाजी छत्रपतीने यांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि छत्रपतीची सूत्रे धारण केली (१६८०). सुमारे नऊ वर्षें मोगल बादशाह औरंगजेब, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी झुंज देऊन त्याने स्वराज्य टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण दुर्दैवाने दक्षिण कोकणात तो मोगल फौजेच्या हाती सापडला. औरंगजेबाने त्याचा क्रूरपणे वध केला (१६८९). औरंगजेबाच्या रायगड वेढ्याच्या प्रसंगी संभाजीची राणी येसूबाई आणि अल्पवयीन पुत्र शिवाजी ऊर्फ शाहू यांना मोगलांनी पकडून आपल्या सोबत नजरकैदेत ठेविले. त्यानंतर संभाजी महाराजांचा धाकटा भाऊ राजाराम आपल्या कुटुंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हाळ्यामार्गे जिंजीकडे निसटून गेला. तिथे आठ-नऊ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्याची गादी राखली. संताजी घोरपडे-धनाजी जाधव यांसारख्या रणशूरांनी गनिमी काव्याने मोगल फौजेस सळो की पळो करून सोडले; तथापि शत्रूचे पाशवी बळ ओळखून राजाराम शिताफीने महाराष्ट्रात निसटून आला व कारभार पाहू लागला; पण इथेही दुर्दैवाने त्याला घेरले व थोड्याशा आजारानंतर तो सिंहगडावर अकाली निधन पावला (१७००).
राजारामाचे पश्चात राणी ताराबाईने आपल्या अल्पवयीन मुलास (शिवाजी) पन्हाळ्यास गादीवर बसविले व त्या स्वतः हिंमतीने कारभार पाहू लागल्या. औरंगजेब बादशाह या काळात मराठ्यांच्या राज्यात ठाण मांडून बसला होता. त्याने आज सर केलेला किल्ला मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी परत घ्यावा, हा क्रम सतत चालू होता. ताराबाई शर्थीने प्रतिकार करून स्वराज्याचा लढा लढवीत होत्या. भद्रकाळी हे तिचे अभिधान सार्थ ठरले. वृद्ध औरंगजेब अखेर १७०७ मध्ये खुलदाबादेस मृत्यू पावला. त्याच्या पश्चात त्याच्या पुत्रांत बादशाहीच्या तख्तासाठी युद्धे झाली आणि मोगल सत्तेचा दरारा झपाट्याने ओसरू लागला. राणी येसूबाई आणि शाहू मोगलांच्या नजरकैदेत होते. आझमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असता शाहूची सुटका केली (१७०७).
शाहूच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. जुने अनेक मातब्बर सरदार आणि मुत्सद्दी शाहूला मिळाले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असता, भीमेकाठी खेड येथे (१७०७) चुलती ताराबाई त्याच्या विरोधात उभी राहिल्या. आपला नवरा राजाराम व आपण स्वतः लढून स्वराज्य टिकविले, त्यावर शाहू हक्क सांगू लागला. म्हणून तिने त्याला तोतया ठरविले व आपला मुलगा राज्याचा खरा वारस असल्याचे जाहीर केले. सामोपचाराने हा गृहकलह मिटेना, तेव्हा उभयपक्षी खेड येथे लढाई झाली व तीत ताराबाईच्या फौजेचा पराभव झाला. यानंतर शाहू साताऱ्यास आला व त्याने छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला (जानेवारी १७०८). त्या वेळी ताराबाईने पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. १७१२ मध्ये तिचा मुलगा शिवाजी वारला. तिची सवत, राजारामाची दुसरी बायको राजसबाई हिने आपला मुलगा संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. ताराबाईची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
सातारा -

शाहू मोगली छावणीत सोळासतरा वर्षे राहून आल्यामुळे त्याला
राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. पराक्रमाची ईर्षाही त्याच्या अंगी नव्हती.
त्याचा स्वभाव ऐषारामी, नेमस्त, धार्मिक आणि प्रसंग निभावून न्यायचा असाच
एकूण होता. मनुष्यस्वभावाची पारख मात्र त्याला उत्तम होती. बाळाजी विश्वनाथ
पेशव्याच्या यत्नामुळे पातशाहीकडून त्याला स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे
हक्क मिळाले असले; तरी त्या हक्कांची अंमलबजावणी करताना आरंभीच्या काळात
त्याला अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. आपल्या मर्यादा तो जाणून
असल्यामुळे अनेक गुणी व पराक्रमी माणसे त्याने आपलीशी केली आणि सु. चाळीस
वर्षे सातारच्या गादीचे ऐश्वर्य व दरारा सर्वत्र वाढवला. या कामी ⇨बाळाजी
विश्वनाथ आणि त्याचा पराक्रमी पुत्र ⇨पहिला बाजीराव हे दोन पहिले पेशवे,
चिमाजीआप्पा, प्रतिनिधी, फत्तेसिंग भोसले, उदाजी चव्हाण, ⇨कान्होजी आंग्रे,
⇨रघूजी मोसले, दाभाडे पितापुत्र आणि पेशव्यांच्या हाताखाली तयार झालेले
पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार बंधू इ. अनेक
कर्तृत्ववान मराठे सरदारांनी निष्ठायुक्त सेवा करून त्याचे राज्य विस्तारित
करून वैभवास नेले. या सर्वांच्या पराक्रमामुळे मोगल, निजाम, पोर्तुगीज,
सिद्दी व इंग्रज हे मराठ्यांचे शत्रू निष्प्रभ झाले.
शाहूच्या मोगल साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे धोरण नांदा व नांदू द्या, या स्वरूपाचे होते. स्वतःचे अंगी कर्तबगारी नसली तरी शहाणपणाने पेशवा, प्रतिनिधी इत्यादींवर भिस्त ठेवून सर्वांच्या कर्तृत्वास तो संधी देत असे पण या धोरणामुळे त्याच्या दरबारात एकवाक्यता व एकजूट राहिली नाही. पेशव्यांनी सर्वाना निष्प्रभ केले व प्रायः तेच राज्याचे सूत्रधार झाले. छ. शाहू १७४९ मध्ये निपुत्रिक वारले. त्याच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आला; पण रामराजापासून छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन सत्तेचे केंद्र पुण्यास गेले व खरे सत्ताधारी पेशवे झाले. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्याने सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा यत्न करून पाहिला; पण या गोष्टीस खुद्द शाहूनेच विरोध केला होता. संभाजीचे नाव पुढे येताच ताराबाईने आपल्या नातावास शाहूच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबाची योजना बारगळली. शाहूनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मुत्सद्यांच्या हाती, अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती.
पेशवाई संपुष्टात आणल्यानंतर इंग्रजांनी सातारच्या ⇨प्रतापसिंह भोसल्यास अभय देऊन गादीवर बसविले व आरंभी ग्रँट डफसारख्या प्रशासकास नेमून एकूण मराठी राज्याची घडी नीट बसवण्यास आरंभ केला. ग्रँट डफचा मराठ्यांचा इतिहासविषयक महत्त्वाचा ग्रंथ याच्याच कारकीदींत लिहिला गेला. ग्रँट डफच्या शिकवणुकीने प्रतापसिंह कारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून स्वतंत्र राज्याधिकारी आहोत, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनी बळावू लागली. इंग्रजांना ही गोष्ट खपली नाही. प्रतापसिंहावर बंडखोरीचा आरोप ठेवून त्यांनी त्याला पदच्युत केले व काशीला नजरकैदेत ठेवले.
प्रतापसिंहानंतर त्याचा भाऊ शहाजी ऊर्फ आप्पासाहेब गादीवर आला; पण वर्षभरात तो मृत्यू पावला. भोसले घराण्यात औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी (मे १८४८) सातारा संस्थान खालसा केले .
कोल्हापूर (करवीर) -

कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिरप्रद झाले, ते
राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई हिचा पुत्र संभाजी याच्यामुळे. ताराबाईचा
पुत्र शिवाजी १७१२ मध्ये वारला. राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने
आपल्या पुत्रास (संभाजीस) कोल्हापूरच्या गादीवर बसविले (१७१४). हा संभाजी
मोठा महत्त्वाकांक्षी व हिकमती होता. शाहूच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा
हातमिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणाकाठी लढाई झाली (१७३०) व तीत
संभाजीचा पराभव झाला. वर्षभराने कराड येथे उभयतांत वाटाघाटी होऊन वारणेचा
तह झाला (एप्रिल १७३१) व दोन्ही राज्यांच्या सीमा ठरून काही वर्षेतरी
गृहकलह थांबला. छ. संभाजीची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे पंचेचाळीस वर्षांची
झाली. आपले राज्य राखण्यासाठी त्याला सातारकर छत्रपतींच्या पेशव्यांशी
अनेकदा संघर्ष करावे लागले. निजाम, हैदर अली, राघोबादादा या पेशव्यांच्या
शत्रूंशी कोल्हापूरकरांनी प्रसंगी हातमिळवणीही केली. पेशव्यांच्या
दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीचे सतत संघर्ष झाले; पण या
संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी
या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर
कोल्हापूरचे राज्य इंग्राजांच्या कृपेवर टिकून राहिले. १८५७ च्या उठावाच्या
प्रसंगी कोल्हापुरात प्रायः शांतता नांदल्याने राज्य वाचले. संभाजीनंतर
(१७६०) छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरू
झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षि ⇨शाहू महाराज
(कार. १८८४-१९२२). त्यांच्या कारकीर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतींत
कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या, त्यांमुळे
भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली. कोल्हापुरात मल्लविद्या आणि
संगीतकला जोपासली गेली, तीही शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच.
महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात सातारचे प्रतापसिंह
आणि कोल्हापूरचे शाहू यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करावा लागतो.
तंजावर -
तंजावर -
छत्रपती शिवाजीं महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी याने
तंजावरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५ मध्ये हे
राज्य मिळवले. आदिलशाहीच्या अंकित असे हे राज्य होते. शिवाजींच्या
कर्नाटकावरील मोहिमेत एकोजीने मैत्रीऐवजी शत्रुत्वाची भूमिका घेतल्यामुळे
त्याला शिवाजीं महाराजांना विरुद्ध पराभूत होऊन पळून जावे लागले; तथापि
शिवाजीं महाराजांनी उदार मनाने त्याचे राज्य अबाधित ठेवले. एकोजीच्या
मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, सरफोजी व तुकोजी या तिघा भावांनी एकामागोमाग १७३६
पर्यंत राज्य केले, तुकोजीनंतर त्याचा पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर
आला; पण तो वर्षभरातच मृत्यू पावला. पुढे तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह
गादीवर आला (१७३९) व त्याने इंग्रजांशी सख्यत्व जोडून १७६३ पर्यंत सु.
पंचवीस वर्षे राज्य केले. तुळजाजी हा त्याचा पुत्र. याची कारकीर्द
भ्रष्टाचार, अनागोंदी, इंग्रजांचा चंचुप्रवेश, हैदरची स्वारी इ. कारणांमुळे
खिळखिळी झाली. अगतिक होऊन अखेर त्याने इंग्रजांकडे कारभार सोपविला आणि
त्यांचे मांडलिकत्व पतकरले. तुळजाजीनंतर दुसरा सरफोजी हा अल्पवयीन दत्तक
पुत्र गादीवर आला. तो सज्ञान होईपर्यंत त्याच्या सावत्र काकाने (अमरसिंह)
कारभार पाहिला. त्यानंतर सरफोजीने पस्तीस वर्षे (१८३२ पर्यंत) इंग्रजांच्या
कृपेने राज्य केले. साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, चित्र इ.
शास्त्रकलांचा तो भोक्ता असल्यामुळे त्याची कारकीर्द सांस्कृतिक दृष्ट्या
महत्त्वपूर्ण ठरली. जिर्णोद्धारित बृहदीश्वर मंदिरातील भोसले वंशविषयक
शिलालेख (१८०३) त्याच्याच कारकीर्दीत कोरला गेला. इंग्रजांनी त्याला राजा
हा किताब देऊन त्याचे अधिकार जवळजवळ संपुष्टात आणले होते. त्याच्या नंतर
राजा शिवाजी १८३३ ते १८५५ पर्यंत गादीवर होता; पण प्रत्यक्षात कारभार
पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला. शिवाजी निपुत्रिक वारल्यामुळे १८५५ मध्ये
इंग्रजांनी तंजावर संस्थान खालसा केले.
तंजावरचे बहुतेक राजे कलाभिज्ञ होते. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य आणि ग्रंथनिर्मिती यांना या घराण्याचा मोठा आश्रय होता. तंजावरचा मराठा दरबार हॉल आणि अनेक भाषांतील हस्तलिखितांनी समृद्ध असे सरस्वती महाल ग्रंथालय या दोन वास्तू म्हणजे तंजावर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. मराठी भाषेप्रमाणे तमिळ, तेलुगू आणि संस्कृत भाषांनाही या घराण्याचा चांगला आश्रय लाभला.