Saturday, 27 April 2013

"भोसले घराणे"


सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी ( १६२४). त्यांपैकी शहाजी हे प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. "राधामाधवविलासचंपू" या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजीराजेंच्या योग्यतेची कल्पना येते.

शहाजीराजास जिजाबाई (सिंदखेडकर लखुजी जाधव यांची कन्या), तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन बायका होत्या. संभाजी आणि शिवाजी छत्रपती हे जिजाउंचे दोन पुत्र आणि तुकाबाईचा व्यंकोजी ऊर्फ एकोजी (तंजावर राज्याचा संस्थापक). या तिघांनी पुढे इतिहासात नाव कमावले. संभाजी कर्नाटकात शहाजीजवळ राहत असे. कनकगिरीच्या लढाईत (१६५४) पस्तीशीतच तो वारला. एकोजीने शहाजीराजे नंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली.

शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना १६४१ मध्ये जिजाऊ मासाहेबा समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. त्यांच्यामुळे शिवाजीच्या स्वतंत्र कर्तृत्वास वाव मिळाला. त्यांच्या साहाय्याने वयाच्या १२ वर्षांपासून शिवाजी जहागिरीचा कारभार पाहू लागला. त्या निमित्ताने पुण्याच्या आसपासचे मोक्याचे किल्ले त्याने ताब्यात घेतले. मावळ्यांनी संघटना करून विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध बंडच पुकारले. यातून मराठ्यांचे स्वराज्य स्थापण्याची कल्पना त्याला सुचली. पुढे प्रसंगानुसार आदिलशाह व मोगल यांच्याशी राजकारण व प्रसंगोपात्त युद्धे करून त्यांनी स्वराज्याची कल्पना स्वतःला राज्याभिषेक (६ जून १६७४) करवून जाहीरपणे सिद्ध केली आणि छत्रपतिपद धारण केले. शिवराई व होन ही नवी नाणी सुरू केली; अष्टप्रधान पद्धती स्थापिली, नवे पंचांग केले आणि राज्यव्यवहारकोश बनवून शासनातील फार्सी शब्दांचे उच्चाटन केले. देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर ३५६ वर्षांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. हे एक अद्‌भुत घडले. स्वराज्याबरोबर धर्मस्वातंत्र्य प्राप्त होऊन मुसलमानी राजवटीत हिंदूंचे खचलेले नीतिधैर्य त्यांना पुन्हा मिळाले.भोसले कुळाचे नाव शिवाजी महाराजांनामुळे इतिहासात अजरामर झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकस्मिक मृत्यूनंतर काही काळ अस्थिरता निर्माण झाली; पण नंतर रायगडावर युवराज संभाजी छत्रपतीने यांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि छत्रपतीची सूत्रे धारण केली (१६८०). सुमारे नऊ वर्षें मोगल बादशाह औरंगजेब, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी झुंज देऊन त्याने स्वराज्य टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण दुर्दैवाने दक्षिण कोकणात तो मोगल फौजेच्या हाती सापडला. औरंगजेबाने त्याचा क्रूरपणे वध केला (१६८९). औरंगजेबाच्या रायगड वेढ्याच्या प्रसंगी संभाजीची राणी येसूबाई आणि अल्पवयीन पुत्र शिवाजी ऊर्फ शाहू यांना मोगलांनी पकडून आपल्या सोबत नजरकैदेत ठेविले. त्यानंतर संभाजी महाराजांचा धाकटा भाऊ राजाराम आपल्या कुटुंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हाळ्यामार्गे जिंजीकडे निसटून गेला. तिथे आठ-नऊ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्याची गादी राखली. संताजी घोरपडे-धनाजी जाधव यांसारख्या रणशूरांनी गनिमी काव्याने मोगल फौजेस सळो की पळो करून सोडले; तथापि शत्रूचे पाशवी बळ ओळखून राजाराम शिताफीने महाराष्ट्रात निसटून आला व कारभार पाहू लागला; पण इथेही दुर्दैवाने त्याला घेरले व थोड्याशा आजारानंतर तो सिंहगडावर अकाली निधन पावला (१७००).
राजारामाचे पश्चात राणी ताराबाईने आपल्या अल्पवयीन मुलास (शिवाजी) पन्हाळ्यास गादीवर बसविले व त्या स्वतः हिंमतीने कारभार पाहू लागल्या. औरंगजेब बादशाह या काळात मराठ्यांच्या राज्यात ठाण मांडून बसला होता. त्याने आज सर केलेला किल्ला मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी परत घ्यावा, हा क्रम सतत चालू होता. ताराबाई शर्थीने प्रतिकार करून स्वराज्याचा लढा लढवीत होत्या. भद्रकाळी हे तिचे अभिधान सार्थ ठरले. वृद्ध औरंगजेब अखेर १७०७ मध्ये खुलदाबादेस मृत्यू पावला. त्याच्या पश्चात त्याच्या पुत्रांत बादशाहीच्या तख्तासाठी युद्धे झाली आणि मोगल सत्तेचा दरारा झपाट्याने ओसरू लागला. राणी येसूबाई आणि शाहू मोगलांच्या नजरकैदेत होते. आझमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असता शाहूची सुटका केली (१७०७).
शाहूच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. जुने अनेक मातब्बर सरदार आणि मुत्सद्दी शाहूला मिळाले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असता, भीमेकाठी खेड येथे (१७०७) चुलती ताराबाई त्याच्या विरोधात उभी राहिल्या. आपला नवरा राजाराम व आपण स्वतः लढून स्वराज्य टिकविले, त्यावर शाहू हक्क सांगू लागला. म्हणून तिने त्याला तोतया ठरविले व आपला मुलगा राज्याचा खरा वारस असल्याचे जाहीर केले. सामोपचाराने हा गृहकलह मिटेना, तेव्हा उभयपक्षी खेड येथे लढाई झाली व तीत ताराबाईच्या फौजेचा पराभव झाला. यानंतर शाहू साताऱ्यास आला व त्याने छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला (जानेवारी १७०८). त्या वेळी ताराबाईने पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. १७१२ मध्ये तिचा मुलगा शिवाजी वारला. तिची सवत, राजारामाची दुसरी बायको राजसबाई हिने आपला मुलगा संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. ताराबाईची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.

सातारा -
शाहू मोगली छावणीत सोळासतरा वर्षे राहून आल्यामुळे त्याला राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. पराक्रमाची ईर्षाही त्याच्या अंगी नव्हती. त्याचा स्वभाव ऐषारामी, नेमस्त, धार्मिक आणि प्रसंग निभावून न्यायचा असाच एकूण होता. मनुष्यस्वभावाची पारख मात्र त्याला उत्तम होती. बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या यत्नामुळे पातशाहीकडून त्याला स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले असले; तरी त्या हक्कांची अंमलबजावणी करताना आरंभीच्या काळात त्याला अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. आपल्या मर्यादा तो जाणून असल्यामुळे अनेक गुणी व पराक्रमी माणसे त्याने आपलीशी केली आणि सु. चाळीस वर्षे सातारच्या गादीचे ऐश्वर्य व दरारा सर्वत्र वाढवला. या कामी ⇨बाळाजी विश्वनाथ आणि त्याचा पराक्रमी पुत्र ⇨पहिला बाजीराव हे दोन पहिले पेशवे, चिमाजीआप्पा, प्रतिनिधी, फत्तेसिंग भोसले, उदाजी चव्हाण, ⇨कान्होजी आंग्रे, ⇨रघूजी मोसले, दाभाडे पितापुत्र आणि पेशव्यांच्या हाताखाली तयार झालेले पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार बंधू इ. अनेक कर्तृत्ववान मराठे सरदारांनी निष्ठायुक्त सेवा करून त्याचे राज्य विस्तारित करून वैभवास नेले. या सर्वांच्या पराक्रमामुळे मोगल, निजाम, पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज हे मराठ्यांचे शत्रू निष्प्रभ झाले.
शाहूच्या मोगल साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे धोरण नांदा व नांदू द्या, या स्वरूपाचे होते. स्वतःचे अंगी कर्तबगारी नसली तरी शहाणपणाने पेशवा, प्रतिनिधी इत्यादींवर भिस्त ठेवून सर्वांच्या कर्तृत्वास तो संधी देत असे पण या धोरणामुळे त्याच्या दरबारात एकवाक्यता व एकजूट राहिली नाही. पेशव्यांनी सर्वाना निष्प्रभ केले व प्रायः तेच राज्याचे सूत्रधार झाले. छ. शाहू १७४९ मध्ये निपुत्रिक वारले. त्याच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आला; पण रामराजापासून छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन सत्तेचे केंद्र पुण्यास गेले व खरे सत्ताधारी पेशवे झाले. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्याने सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा यत्न करून पाहिला; पण या गोष्टीस खुद्द शाहूनेच विरोध केला होता. संभाजीचे नाव पुढे येताच ताराबाईने आपल्या नातावास शाहूच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबाची योजना बारगळली. शाहूनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मुत्सद्यांच्या हाती, अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती.
पेशवाई संपुष्टात आणल्यानंतर इंग्रजांनी सातारच्या ⇨प्रतापसिंह भोसल्यास अभय देऊन गादीवर बसविले व आरंभी ग्रँट डफसारख्या प्रशासकास नेमून एकूण मराठी राज्याची घडी नीट बसवण्यास आरंभ केला. ग्रँट डफचा मराठ्यांचा इतिहासविषयक महत्त्वाचा ग्रंथ याच्याच कारकीदींत लिहिला गेला. ग्रँट डफच्या शिकवणुकीने प्रतापसिंह कारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून स्वतंत्र राज्याधिकारी आहोत, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनी बळावू लागली. इंग्रजांना ही गोष्ट खपली नाही. प्रतापसिंहावर बंडखोरीचा आरोप ठेवून त्यांनी त्याला पदच्युत केले व काशीला नजरकैदेत ठेवले.
प्रतापसिंहानंतर त्याचा भाऊ शहाजी ऊर्फ आप्पासाहेब गादीवर आला; पण वर्षभरात तो मृत्यू पावला. भोसले घराण्यात औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी (मे १८४८) सातारा संस्थान खालसा केले .

कोल्हापूर (करवीर) -
कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिरप्रद झाले, ते राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई हिचा पुत्र संभाजी याच्यामुळे. ताराबाईचा पुत्र शिवाजी १७१२ मध्ये वारला. राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने आपल्या पुत्रास (संभाजीस) कोल्हापूरच्या गादीवर बसविले (१७१४). हा संभाजी मोठा महत्त्वाकांक्षी व हिकमती होता. शाहूच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा हातमिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणाकाठी लढाई झाली (१७३०) व तीत संभाजीचा पराभव झाला. वर्षभराने कराड येथे उभयतांत वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला (एप्रिल १७३१) व दोन्ही राज्यांच्या सीमा ठरून काही वर्षेतरी गृहकलह थांबला. छ. संभाजीची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे पंचेचाळीस वर्षांची झाली. आपले राज्य राखण्यासाठी त्याला सातारकर छत्रपतींच्या पेशव्यांशी अनेकदा संघर्ष करावे लागले. निजाम, हैदर अली, राघोबादादा या पेशव्यांच्या शत्रूंशी कोल्हापूरकरांनी प्रसंगी हातमिळवणीही केली. पेशव्यांच्या दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीचे सतत संघर्ष झाले; पण या संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर कोल्हापूरचे राज्य इंग्राजांच्या कृपेवर टिकून राहिले. १८५७ च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापुरात प्रायः शांतता नांदल्याने राज्य वाचले. संभाजीनंतर (१७६०) छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरू झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षि ⇨शाहू महाराज (कार. १८८४-१९२२). त्यांच्या कारकीर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतींत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या, त्यांमुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली. कोल्हापुरात मल्लविद्या आणि संगीतकला जोपासली गेली, तीही शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात सातारचे प्रतापसिंह आणि कोल्हापूरचे शाहू यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करावा लागतो.

तंजावर -
छत्रपती शिवाजीं महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी याने तंजावरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५ मध्ये हे राज्य मिळवले. आदिलशाहीच्या अंकित असे हे राज्य होते. शिवाजींच्या कर्नाटकावरील मोहिमेत एकोजीने मैत्रीऐवजी शत्रुत्वाची भूमिका घेतल्यामुळे त्याला शिवाजीं महाराजांना विरुद्ध पराभूत होऊन पळून जावे लागले; तथापि शिवाजीं महाराजांनी उदार मनाने त्याचे राज्य अबाधित ठेवले. एकोजीच्या मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, सरफोजी व तुकोजी या तिघा भावांनी एकामागोमाग १७३६ पर्यंत राज्य केले, तुकोजीनंतर त्याचा पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर आला; पण तो वर्षभरातच मृत्यू पावला. पुढे तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह गादीवर आला (१७३९) व त्याने इंग्रजांशी सख्यत्व जोडून १७६३ पर्यंत सु. पंचवीस वर्षे राज्य केले. तुळजाजी हा त्याचा पुत्र. याची कारकीर्द भ्रष्टाचार, अनागोंदी, इंग्रजांचा चंचुप्रवेश, हैदरची स्वारी इ. कारणांमुळे खिळखिळी झाली. अगतिक होऊन अखेर त्याने इंग्रजांकडे कारभार सोपविला आणि त्यांचे मांडलिकत्व पतकरले. तुळजाजीनंतर दुसरा सरफोजी हा अल्पवयीन दत्तक पुत्र गादीवर आला. तो सज्ञान होईपर्यंत त्याच्या सावत्र काकाने (अमरसिंह) कारभार पाहिला. त्यानंतर सरफोजीने पस्तीस वर्षे (१८३२ पर्यंत) इंग्रजांच्या कृपेने राज्य केले. साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, चित्र इ. शास्त्रकलांचा तो भोक्ता असल्यामुळे त्याची कारकीर्द सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली. जिर्णोद्धारित बृहदीश्वर मंदिरातील भोसले वंशविषयक शिलालेख (१८०३) त्याच्याच कारकीर्दीत कोरला गेला. इंग्रजांनी त्याला राजा हा किताब देऊन त्याचे अधिकार जवळजवळ संपुष्टात आणले होते. त्याच्या नंतर राजा शिवाजी १८३३ ते १८५५ पर्यंत गादीवर होता; पण प्रत्यक्षात कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला. शिवाजी निपुत्रिक वारल्यामुळे १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावर संस्थान खालसा केले.
तंजावरचे बहुतेक राजे कलाभिज्ञ होते. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य आणि ग्रंथनिर्मिती यांना या घराण्याचा मोठा आश्रय होता. तंजावरचा मराठा दरबार हॉल आणि अनेक भाषांतील हस्तलिखितांनी समृद्ध असे सरस्वती महाल ग्रंथालय या दोन वास्तू म्हणजे तंजावर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. मराठी भाषेप्रमाणे तमिळ, तेलुगू आणि संस्कृत भाषांनाही या घराण्याचा चांगला आश्रय लाभला.

Tuesday, 26 June 2012

लोकराजा राजर्षी शाहू महाराज (यशवंत अप्पासाहेब घाटगे) जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२

 
राजर्षी शाहू महाराज


शाही घराणे - भोसले.
वडील - अप्पासाहेब घाटगे.
आई - राधाबाई.


चौथे शाहू, अर्थात शाहू महाराज, हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान महाराज होते.

जीवन

शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.


कार्य

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष शाहू महाराजांच्याच काळात झाला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकर्‍यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे अश्या उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.


राजर्षी शाहू महाराज


राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. राजर्षी शाहूंना ब्रह्मणेतर चळवळीचे उद्गातेच म्हटले जाते. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.

राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

अशा या द्रष्ट्या, पुरोगामी नेत्याचे ६ मे, १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.



 Paya Bharani Sahuji

 

Personal

In 1891, Shahu was wed to Lakshmibai née Khanvilkar (1880–1945), daughter of a Maratha nobleman from Baroda. They were the parents of four children:
1.Rajaram II, who succeeded his father as Maharaja of Kolhapur.
2.Radhabai 'Akkasaheb' Puar, Maharani of Dewas (senior) (1894–1973) who married Raja Tukojirao III of Dewas (Senior) and had issue:
  • Vikramsinhrao Puar, who became Maharaja of Dewas (Senior) in 1937 and who later succeeded to the throne of Kolhapur as Shahoji II.
3.Sriman Maharajkumar Shivaji (1899–1918)
4.Srimati Rajkumari Aubai (1895); died young
Chhatrapati Shahu of Kolhapur died on May 6, 1922. He was survived by his wife, his elder son Rajaram and his daughter Radhabai.

Full name and titles

His full official name was: Colonel His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Sir Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, GCSI, GCIE, GCVO
During his life he acquired the following titles and honorific names:
  • 1874-1884: Meherban Shrimant Yeshwantrao Sarjerao Ghatge
  • 1884-1895: His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, Raja of Kolhapur
  • 1895-1900: His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Sir Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, Raja of Kolhapur, GCSI
  • 1900-1903: His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Sir Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, Maharaja of Kolhapur, GCSI
  • 1903-1911: His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Sir Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, Maharaja of Kolhapur, GCSI, GCVO
  • 1911-1915: His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Sir Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, Maharaja of Kolhapur, GCSI, GCIE, GCVO
  • 1915-1922: Colonel His Highness Kshatriya-Kulawatasana Sinhasanadhishwar, Shrimant Rajarshi Sir Shahu Chhatrapati Maharaj Sahib Bahadur, Maharaja of Kolhapur, GCSI, GCIE, GCVO

Honours

  • Knight Grand Commander of the Order of the Star of India (GCSI)-1895
  • King Edward VII Coronation Medal-1902
  • Knight Grand Cross of the Royal Victorian Order (GCVO)-1903
  • Hon. LLD (Cantab.)-1903
  • Delhi Durbar Gold Medal-1903
  • King George V Coronation Medal-1911
  • Knight Grand Commander of the Order of the Indian Empire (GCIE)-1911
  • Delhi Durbar Gold Medal-1911


Titles

  • Shahu IV of Kolhapur
Bhonsle Dynasty (Kolhapur line)
Born: 26 July 1874 Died: 6 May 1922
Regnal titles
Preceded by
  • Himself
(as Raja of Kolhapur) Maharaja of Kolhapur
1900-1922
Succeeded by
  • Rajaram II
  • Shivaji IV
(as Raja of Kolhapur) Raja of Kolhapur
1884-1900
Succeeded by Himself (as Maharaja of Kolhapur).
 

Saturday, 14 January 2012

पानिपत. Panipat

पानिपतचे तिसरे युद्ध


पानिपत - ३ या युद्धाला आज (१४ जानेवारी, २०१२ रोजी) २५१ वर्ष पूर्ण झालीत.त्याबद्दल थोडेसे...

पानिपत
पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.

इतिहास
या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.
पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
पानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, जानेवारी १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.

मराठा साम्राज्य. (Maratha Empire)

पानिपतची ३री लढाई

पानिपतची ३री लढाई
मराठे-दुराणी युद्ध यातील एक भाग

पानिपतचे युद्ध
दिनांक जानेवारी १४ १७६१
ठिकाण पानिपत, हरयाणा, भारत
परिणती दुराणींचा विजय परंतु प्रचंड नुकसान
युद्धमान पक्ष
Flag of the Maratha Empire.svg मराठा साम्राज्य दुराणी साम्राज्य
सेनापती
सदाशिवराव भाऊ
इब्राहिम खान गारदी
जनकोजी शिंदे
मल्हारराव होळकर
सरदार पुरंदरे
सरदार विंचुरकर
अहमदशाह अब्दाली
नजीब उद दौला
सैन्यबळ
४०००० घोडदळ
२०० तोफा
१५००० पायदळ सैनिक
१५००० पिंडारी
२-३ लाख बुणगे (न लढणारे यात्रेकरू, स्त्रिया व मुले)
४२००० घोडदळ
१२०-१३० तोफा
३८००० पायदळ सैनिक
१०००० राखीव सैनिक
१०००० इतर
बळी आणि नुकसान
लढाऊ सैन्य:१५,०००-२०,०००. नागरिक= ३०,०००-३५,०००. एकूण :४५,००० ते ५५,०००. ३५,००० ते ४०,०००

 

 

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

 

पार्श्वभूमी

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमुर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकर दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.

 

युद्धाआधीच्या घडामोडी
भाउंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्‍याच इतिहासकारांचे मत आहे. अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले.अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकी मध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पुर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होउ लागली.

 

पानिपतची कोंडी - 

पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते. अब्दाली ने संधी करायचा प्रयत्न केला परंतु नजीबने तो होउ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होइल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरते शेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून दिल्लीला पोहोचायचे जिथे रसद पुरवठा निश्चित होता, असे ठरले.

 

लढाई

व्युहरचना - 

मराठे रणांगणाच्या उत्तरेस स्थित होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळित होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरूण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी लोकांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.

अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसर्‍या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली.

 

युद्धाची सुरुवात -
मराठ्यांकडील अन्नाचा साठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहर्‍यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत.
मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.
दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.


अंतिम सत्र -
पानिपतची तिसरी लढाई १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपर्‍यात बुणग्यांच्या शिबीरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत. 









शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत्. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्‍या उंटावरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचिक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.

 

अंतर्गत उठाव -
कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले. भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.

 

कत्तल

मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरुवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.
पळणार्‍या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्नीला म्रुत्यूदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या रक्षकांसोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या.
अफगाण्यांनी दुसर्‍या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व नागरिकांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.

 

युद्धाचे परिणाम

मराठ्यांची दुर्दशा - 
पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.


अब्दालीचा शेवटचा विजय - 
या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्‍या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लुट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.


नानासाहेबांचा मृत्यु - 
पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.


मोगलांची दुर्दशा - 
पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.


इंग्रजांचा वाढता प्रभाव - 
नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणार्‍या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणार्‍य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.


शीखांची सत्ता स्थापना - 
पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही त्यांच्या मालकीचा पंजाभ होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.


हैदरअलीचा उदय - 
पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.


माधवराव पेशव्यांचा उदय - 
नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्‍या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.

 

उभयपक्षी चुका

मराठ्यांच्या चुका -

युद्धव्यवस्थापन -
अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.

 

बांडगूळ बुणगे -
यातच पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाहीजास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.

 

राजकारण -
मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला.

 

दुराण्यांच्या चुका

मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.


पानिपत मोहिमेचा खर्च ९०० कोटी रुपये.
(The decisive Maratha - Afghan war in 1761 at Panipat Total expenditure 900 Crore Rupees)

भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या पानिपतच्या लढाईचा एकूण खर्च किती आला असेल असे वाटते? आतापर्यंत, या लढाईत किती शूर वीर मराठ्यांनी गमावले याची माहिती आपण इतिहासात नेहमीच वाचतो. परंतु ही एवढी मोठी व दीर्घ काल चाललेली मोहिम करण्यासाठी पेशवे दरबारला एकूण किती खर्च आला याचा निश्चित आकडा कोणासच माहीत नव्हता.
अहमद शाह अबदाली दिल्लीवर चालून येत आहे हे समजताच मार्च १९ १७६० रोजी सदाशिव राव भाऊ यांना दारूगोळा, सैन्य व आवश्यक तेवढे धन देऊन नानासाहेब पेशवे यांनी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी पाठ्वले होते. १ ऑगस्ट १७६० ला मराठे दिल्लीला पोचले होते व दुसर्‍या दिवशी त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला होता. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला होता.
अहमद शाह अबदाली आणि मराठी फौज यांच्यातील युद्ध १४ जानेवारी १७६१ ला पानिपत येथे लढले गेले होते व या लढाईमध्ये मराठ्यांचा दारूण पराभव झाला होता. युद्धक्षेत्रावर मराठ्यांचा पराभव झाला असला तरी नंतरच्या काळात या मोहिमेवर पेशवे दरबारचा खर्च चालूच होता. पेशवे दरबारच्या हिशोबनीसांनी या युद्धावर झालेल्या खर्चाचा हिशोब अगदी बारीक तपशीलासह लिहून ठेवलेला आहे. या खर्चामध्ये कोणत्या प्रकारचा दारूगोळा मराठ्यांनी वापरला होता? ऊंट, हत्ती यावर किती खर्च झाला होता? याची नोंद आहे. मराठ्यांनी 18 कारखाने युद्धक्षेत्रात उभे केले होते. या कारखान्यात लोहार, सुतार, मिस्त्री आणि मजूर यांच्यावरचा खर्च, सैन्यासाठी गुप्त हेर, न्हावी,शिंपी आणि पहारेकरी यांच्यावरचा खर्च, या सर्व खर्चांची नोंद या हिशोबनीसांनी ठेवलेली आहे.
पेशवे दरबारने या युद्धावर एकूण ९२,२३,२४२  रुपये आणि ९ आणे (बाण्णव लाख तेवीस हजार दोनशे बेचाळीस रुपये व नऊ आणे) एवढा खर्च केला होता. या खर्चात २ ऑगस्टला दिली ताब्यात घेतल्यावर पुढचे साडेतीन महिने शिबंदीवरील खर्च, दिल्लीतील देवळे व मशिदी यांना दिलेल्या देणग्या, संत ,फकिर, मौलवी यांना दिलेली बिदागी यावरील खर्च निराळा दाखवलेला आहे. हा खर्च १४,७१,३२६  रुपये (चवदा लाख एकात्तर हजार तीनशे सव्वीस रुपये) एवढा झाला होता.
१७६१ ते २०११  या कालातील रुपयाच्या किंमतीतील फरक लक्षात घेतला तर आजच्या रुपयाच्या किंमतीनुसार मोहिमेचा एकूण खर्च ९०० कोटी रुपये व दिल्लीतील खर्च १५० कोटी रुपये येतो. पुण्यातील एक इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी नुकतेच काही नवीन मोडी कागदपत्रांचे वाचन केले असता ही माहिती उजेडात आली. हे पैसे मराठ्यांनी कसे उभे केले असतील याची कल्पना या कागदपत्रांवरून येते असे श्री. बलकवडे यांचे मत आहे.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काळात मराठी सत्ता किती वैभवसंपन्न असली पाहिजे याची एक चुणूक या हिशोबामुळे उजेडात आली आहे.

Saturday, 15 October 2011

मराठीभाषा - गळचेपीची कारणं. Marathibhasha - Galchepichi karna.

आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही‌, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच आहेत !
मनातल्या या शंकांवर काल विचार करत असताना एक माईंड मॅप तयार झाला. यातल्या ठळक कारणांवर नजर टाकता येईल :

मराठी भाषा 


१. भाषिक बाजारपेठ :
जिथे रिटर्न्स , तिथे इन्वेस्टमेंट, हा बदलत्या व्यावसायिक जगाचा पहिला नियम आहे. प्रत्येक उद्योजक त्याचं उत्पादन आणखी कसं विकल जाईल व नफा कसा वाढेल या प्रयत्नात असतो. उत्पादनविक्रीला जे काही‌ अडथळे येतात ते निपटण्याची‌ काळजी घेतली जाते .. मग तो अडथळा भाषेचा का असेना. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे युनिकोड अक्षरं पद्धती. विषेशत: युरोपीयन समुदायाचं युरो हे चलन अस्तित्वात आल्यानंतर एकाच वेळी अनेक भाषांमधे संगणन करण्याची प्रकर्षाने गरज भासू लागली व ही‌ समस्या सोडविण्यासाठी अनेक बलाढ्य कंपन्यांनी निधी उभा करून युनिकोड एककांची‌ निर्मिती‌ केली. यात भाषा आणि व्यावसायिकता यांचा मेळ घातला जात असताना महत्वाच्या गोष्टी‌ लक्षात येतात :
१. तेथील स्थानिक भाषांचा वापर – ‘उद्योजक ते उद्योजक (B-B)’ आणि ‘उद्योजक ते उपभोक्ता (B-C)’ या सर्व व्यवहारांमधे होतो.
२. ते काम त्या भाषेत करण्यावाचून अडलं होतं, व त्या अडवणूकीत कंपन्यांचं आर्थिक नुकसान होतं.
३. प्रकल्पातून मोबदल्याची शाश्वती
याच निकषावर आपण आत्मपरिक्षण केले तर पुढील प्रश्न उभे रहातात ..
१. संपुर्ण व्यवहारासाठी केवळ मराठीचा वापर करणारे B-B उद्योजक किती ?
२. किती , कोणत्या व्यवहारामधे मराठी-वाचून अडतय ? ( आपन अडून बसलो ? )
३. व्यावसायिक सेवांच्या मराठीकरणावर ‘रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट’ किती ?
आणि एक सत्य समोर येते, ते म्हणजे महाराष्ट्रातल सत्ताकारण आणि सहकारी साखर कारखाने याशिवाय असलेल्या व्यवहारी जगातली अर्थसत्ता मराठी भाषेवर अवलंबून नाही, त्यामुळे व्यवहारी जगात मराठी भाषा म्हणून कमी पडते.

२. शैक्षणिक अंधश्रद्धा :
भारतीय मनाला साहेबाच्या रंगाचं आणि बोलीचं भलतच कौतुक. इंग्रजीत बोलणं म्हणजे शहाण्या माणसाचं लक्षण, हा समज गेली दिडशे वर्षात ‘जनुकांमधे’ इतका भिनलाय की‌ आपण हाही विचार करायला विसरलो की – इंग्लंड/अमेरिकेतले वेडे इंग्रजीच बोलत असतील ना ?
केवळ इंग्रजी बोलणं वेगळं आणि स्वत:ची पंचैंद्रिय वापरून, त्याला तारतम्याची जोड देत विचारशक्तीला पणाला लावून कला-ज्ञान-विज्ञानच्या क्षेत्रात भराऱ्या मारणं वेगळं, याच भानच संपलय. याच गैरसमजातून निर्माण झालेली शैक्षणिक अंधश्रद्धा म्हणजे – इंग्रजी शाळांतून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. याच अंधश्रद्धेपोटी कित्येक पालक खिशाला न परवडणाऱ्या शाळांमधे मुलांना घालतात. याविषयावर एक वेगळंच ब्रेन-स्टॉर्मिंग होईल, पण जाता जाता काही प्रश्न :
१. तुमची‌ मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा एखाद्या राजकीय शिक्षण सम्राटाची तर नाही‌ ना ? त्यातले शिक्षक कोणत्या भाषेत शिकले ?
२. मराठी शाळेपेक्शा असं काय जास्त इंग्रजी शाळेत शिकवलं जाईल असं पालकांना वाटतं, जे त्यांना मुलाला शिकवता येणार नाही ?
३. आज देशविदेशात उच्चपदस्थ व्यक्तीची शालेय शिक्षण कोणत्या माध्यमात झाले ?
४. इंग्लंड अमेरिकेत नावाजलेल्या महर्षी स्कूल प्रमाणे भारतातल्या इंग्रजी शाळांत वैदीक गणित, संस्कृत शिकवतात का ? का नाही ?
५. आपला पाल्य (फक्त) इंग्रजी‌ बोलणारा पोपट करायचाय ?

३. भाषेचं राजकारण :
स्वातंत्र्यानंतर काही पक्षांनी त्यांच्या स्वातंत्यपूर्व इतिहासाचं भांडवल केलं आणि सत्ता मिळवली आणि उरलेल्यांनी सत्तेसाठी कारण शोधली.
अपवादात्मक चळवळी पक्ष सोडले तर इतर केवळ शंखच आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे – भाषेचं राजकारण !
१. जर मराठी भाषा ‘वर्ल्ड क्लास’ झाली तर आत्ता भाषेसाठी राजकारण करणारे नंतर काय करतील ? त्यांना खरच असं व्हावं असं वाटत असेल का ?
२. एक पक्ष भाषेचं राजकारण करतो आणि दुसरा पक्ष पहिल्याला नामोहरम करतो .. यात भाषासमृद्धी कशी‌ होणार ?
३. पहिले दोने मुद्दे जर तुम्हाला पटत असतील तर त्याच्या अनुषंगाने खरच राजकारण आहे का ?

४. अ विज्ञान भाषा
आजच्या जगात वापरल्या जाणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाचा शोध पाश्चिमात्य देशातला, मग विज असो, अवजड यंत्र असोत कि माहिती‌ तंत्रज्ञान, मोबाईल फोन. हे सर्व तिकडून आल्याने त्या भाषेतले शब्द मराठीत येणार हे उघड आहे. त्यासाठी नव-नविन शब्द योजले तर उत्तम पण त्यामुळे भाषेवर आक्रमण झाले वगैरे समज करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण ‘योगाला’ ‘डिव्हाईन-जॉईन-स्ट्रेचेस’ असा शब्द मी कुठे पाहिला नाही, तो इंग्रजी (व इतर) भाषांनी आहे तसा स्विकारला. गुरू , अवतार, बुद्धा, मंत्रा, धान हे शब्द भारतीय भाषांमधून/संस्कृतीतून जशेच्या इंग्रजीमधे गेले, … हो पण एक नक्की आजच्या जगातल ज्ञान विज्ञान हे मूळातून मराठी भाषिकांनी मराठी भाषेत संशोधन करून निर्माण केलं नसल्याने , त्यातील शब्द आपल्या भाषेत आलेत, हे वास्तव स्विकारायला हवं

५. शिक्षण सम्राटांची धोरणं
विना अनुदान सुरू केलेल्या इंग्रजी शाळांमधे रग्गड पैसा मिळतो हे लक्षात आल्याने नियम #१ नुसार याची बेसुमार वाढ आहे. हेच होत असताना चांगल्या दर्जाच्या शाळा मराठी माध्यमातून सुरू करण्याकडे दुर्लक्ष.

थोरले बाजीराव पेशवे (महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा महापराक्रमी). Thorale Bajirav Peshve (Maharashtrala Maharashtrabaher nenara Mahaparakrami)


थोरले बाजीराव पेशवे
थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, १६९९ - एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या. जेव्हा छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्यासमोर हतबल झाले, तेव्हा त्यांनी गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजीरावांना गुप्त पत्र लिहिले. अर्थात बाजीरावांनी तिथेही आपल्या तलवारीची किर्ती कायम ठेवली. त्याची परतफेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भूभाग बाजीरावांना नजर केला. शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी "मस्तानी" त्यांना दिली.
बाळाजीच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासून ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता, ते वर्चस्व पुन:प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के-कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. थोरल्या बाजीरावांची मुद्रा -
॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान॥

बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे.
थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.
पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्ला बांधून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" याने छत्रसाल बुंदेलावर आक्रमण केले. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजीरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.
या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील.
या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला.
चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण घाट आणि किनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक होते.